चालू घडामोडी – २० ऑगस्ट २०२४ (Current affairs in Marathi)

⚫ केरळ फुटबॉल असोसिएशनचे (KFA) सरचिटणीस पी अनिलकुमार यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF) चे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

⚫ एम्पिल वादळाने पूर्व जपानला तडाखा दिला.

⚫ एअर चीफ मार्शल चौधरी यांनी सत्यजित लाल यांच्या ‘1971 स्ट्रॅटेजी कॅम्पेन शौर्य’ पुस्तकाचे अनावरण केले.

⚫ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील मन्याचीवाडी येथे राज्यातील पहिल्या ‘सोलर व्हिलेज’चे उद्घाटन केले.

⚫ भारत आणि श्रीलंका देशांदरम्यान ‘मित्र शक्ती’ या संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.