चालू घडामोडी – १ नोव्हेंबर २०२३ (Current affairs in Marathi)

⚫ 37 व्या राष्ट्रीय खेळ (गोवा) मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रियांका गोस्वामीने महिलांच्या 20 किमी रेस वॉकमध्ये 1 तास 36 मिनिटे 35 सेकंदात पुर्ण करत एक विक्रम केला.

⚫ लिओनेल मेस्सीने 2023 मधील सर्वात्कृष्ट फूटबॉल खेळाडू म्हणून 8 व्यांदा बॅलन डी ओर हा पुरस्कार जिंकला.

⚫ स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ने महेंद्रसिगं धोनीला बॅंकेचे अधिकृत ब्रॅड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली.

⚫ युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान ऋषी सुनक 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी ब्लेचले पार्क, बकिंगहॅम शायर येथे AI समिट 2023 चे आयोजन करणार आहेत.

⚫ 2023 चा USISPF ग्लोबल लिडरशिप परोपकार आणि CSR अवार्ड नीता अंबानी यांना मिळाला.

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील छल्ला गावात भारतातील पहिले लैव्हेंडर फार्म तयार केले जात आहे.

केंद्रीय दक्षता आयोगाने दक्षता जागरुकता सप्ताह 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत चालणार आहे. या वर्षीची थीम “भ्रष्टाचाराला नाही म्हणा; राष्ट्राला वचनबद्ध राहा” आहे