चालू घडामोडी – ११ नोव्हेंबर २०२३ (Current affairs in Marathi)

⚫ इंदौर शहरात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटने ‘पोशन भी पढाई भी’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.

⚫ WHO 2023 च्या ग्लोबल टीबी अहवालानुसार, 2022 मध्ये जगात क्षयरोगाचे (टीबी) सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत.

⚫ अमूल या ब्रॅडला आयकॉनिक चेंजमेकर ऑफ द इयर 2023 पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

⚫ मायकेल डग्लसला IFFI मध्ये सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.

⚫ संतोष कुमार झा हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) असतील.

⚫ QS आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये पेकिंग विद्यापीठाने सलग दुसऱ्या वर्षी आशियातील आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

⚫ बंगालच्या उपसागरात भारत आणि बांगलादेश नौदलांमधील द्विपक्षीय सराव, बोंगोसागर-23 आणि समन्वयित गस्त (CORPAT) ची 5वी आवृत्ती पार पडली.