चालू घडामोडी – २८ नोव्हेंबर २०२३ (Current affairs in Marathi)

⚫ डॉ. सुजित रॉय यांना NASA Impact planet अवार्ड मिळाला.

⚫ अनिश शहा यांची FICCI चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

⚫ संयुक्त राष्ट्र हवामान परिषद (COP28) युएई मध्ये आयोजित केली जाणार आहे.

⚫ संयुक्त अरब अमिराती या देशाने जगातील सर्वात मोठ्या सिंगल-साइट सोलर पॉवर प्लांट ‘अल धफ्रा’ प्रकल्पाचे उद्घाटन केले.

⚫ पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 चा शुभंकर ‘उज्ज्वला – एक चिमणी’ आहे.

⚫ भारत-नेपाळ संयुक्त लष्करी सराव ‘सूर्य किरण-XVII’ पिठोरागढ, उत्तराखंड होत आहे.

⚫ वाडीनार, गुजरात येथे भारतीय तटरक्षक दलाने 9वा राष्ट्रीय स्तरावरील प्रदूषण प्रतिसाद सराव (NATPOLREX-IX) आयोजित केला.

⚫ जागतिक शाश्वत वाहतूक दिवस 2023 ची थीम ‘शाश्वत वाहतूक, शाश्वत विकास’ ही आहे.

⚫ ओडिशा राज्यात आशियातील सर्वात मोठा ओपन एअर वार्षिक व्यापार मेळा ‘बाली यात्रा’ उदघाटन करण्यात आला.

⚫ सोमशेखर सुंदरेसन यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

⚫ अबू धाबी ग्रॅड प्रिक्स २०२३ मॅक्स वर्स्टॅपेन याने जिंकली.

⚫ उत्तर प्रदेश मधील बुंदेलखंड एक्सप्रेसवे हा पहिला सोलर एक्स्प्रेसवे असेल.