चालू घडामोडी – ३० नोव्हेंबर २०२३ (Current affairs in Marathi)

आरईसी लिमिटेडला ASSOCHAM द्वारे “विविधता आणि समावेशातील धोरणांसाठी सर्वोत्तम नियोक्ता” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

⚫ म्यानमारने बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला मायकॉन्ग हे नाव दिले आहे.

⚫ ‘प्रणव, माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्’ या पुस्तकाचे लेखक शर्मिष्ठा मुखर्जी आहेत.

⚫ मेरियम-वेबस्टर डिक्शनरीने 2023 साठी निवडलेला “वर्ड ऑफ द इयर” Authentic हा आहे.

⚫ अलीकडेच कंबोडिया देशातील अंगकोर वाट मंदिरला जगातील आठवे आश्चर्य म्हणून मान्यता मिळाली.

⚫ जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियम, कटक, ओडिशा येथे अल्टीमेट खो खो (UKK) ची दुसरी आवृत्ती होणार आहे.

⚫ सध्या चर्चेत असलेले बर्डा वन्यजीव अभयारण्य गुजरात राज्यात आहे.

⚫ इटलीने मालागा, स्पेन येथे झालेल्या डेव्हिस कप २०२३ चे विजेतेपद जिंकले आहे.