चालू घडामोडी – ७ नोव्हेंबर २०२३ (Current affairs in Marathi)

⚫ बांगलादेश 2025 मध्ये 24 व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन करेल.

⚫ फ्रान्समध्ये व्हाईट हायड्रोजनचे साठे सापडले आहेत.

⚫ भारताने इटली या देशासोबत मोबीलिटी ॲड मायग्रेशन करार केला आहे.

⚫ केंद्रीय दळणवळण आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे की भारत 2024 मध्ये जागतिक दूरसंचार मानकीकरण असेंब्ली (WTSA) आयोजित करणार आहे.

⚫ बांगलादेशघ्या सायमा वाजेद या जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्राच्या पुढील प्रादेशिक संचालक म्हणून काम करतील.

⚫ केरळ राज्याने ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2023 जिंकला.

⚫ श्री सोमनाथ ट्रस्ट (SST) च्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे.

⚫ संयुक्त राष्ट्रांच्या प्रशासकीय आणि अर्थसंकल्पीय प्रश्नांवरील सल्लागार समितीवर (ACABQ) सेवा देण्यासाठी सुरेंद्र अधना यांची पुन्हा निवड झाली.