चालू घडामोडी – १३ सप्टेंबर २०२४ (Current affairs in Marathi)

⚫ मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगाने देशात प्रथमच राज्याची राजधानी भोपाळमध्ये पेपरलेस मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

⚫ इंटरनॅशनल चेस फेडरेशन (FIDE) ने बुडापेस्ट, हंगेरी येथे 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले.

⚫ ओमानमधील सलालाह येथे भारत-ओमान संयुक्त लष्करी सराव “अल नजाह” च्या 5 व्या आवृत्तीसाठी भारतीय सैन्य दल रवाना झाले आहे. अल नजाह हा सराव 2015 पासून द्विवार्षिक आयोजित केला जातो.

⚫ पोलाद मंत्रालयाने ‘ग्रीनिंग स्टील: पाथवे टू सस्टेनेबिलिटी’ या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन CD देशमुख हॉल, इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे केले.

⚫ महाराष्ट्रात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.

⚫ राष्ट्रपती रणचंद्र पौडेल यांनी नवनियुक्त लष्करप्रमुख (CoAS) अशोक राज सिग्देल यांना शपथ दिली.