⚫ विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
⚫ पीआर श्रीजेश यांची भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
⚫ पहिली जागतिक महिला कबड्डी लीग हरियाणामध्ये सुरू होणार आहे. ग्लोबल प्रवासी महिला कबड्डी लीग (GPKL) असे नाव देण्यात आले आहे, स्पर्धेत 15 हून अधिक देशांतील महिला खेळाडू सहभागी होतील.
⚫ राज्य सरकारने रत्नागिरीतील जिओग्लिप्स आणि पेट्रोग्लिफ्स ‘संरक्षित स्मारके’ म्हणून अधिसूचित केले आहेत.
⚫ नोंदणी नसलेली मंदिरे, मठ आणि धार्मिक ट्रस्ट नोंदणीकृत करण्याच्या सूचना बिहार सरकारने सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
⚫ अंमलबजावणी संचालनालय (ED) चे कार्यवाहक प्रमुख राहुल नवीन यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी एजन्सीचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. अजय कुमार भल्ला यांच्यानंतर आयएएस अधिकारी गोविंद मोहन यांची पुढील केंद्रीय गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
⚫ महाराष्ट्र सरकारतर्फे आशा पारेख यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाजी साटम यांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.