⚫ SEBI ने अनिल अंबानी यांना रोखे बाजारातून(Security market) पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.
⚫ पंजाबमध्ये, “आरंभ” कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे, ज्याचा उद्देश बालपणीचे शिक्षण वाढवणे आहे.
⚫ माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या रनअपमध्ये नवी दिल्ली येथे ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज-सीझन वन’ लाँच केले.
⚫ भाजप नेते तरुण चुग यांच्या ‘मोदीज गव्हर्नन्स ट्रायम्फ’ या पुस्तकाचे अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन केले.
⚫ भारताने अरुणाचल प्रदेशातील तवांग आणि दिबांग व्हॅली जिल्ह्यांमधील उच्च-जोखीम असलेल्या हिमनदी तलावांचे पहिले सर्वेक्षण सुरू केले.
⚫ युनिफाइड पेन्शन योजना लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे..
⚫ आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतीय संघाने रौप्य पदक जिंकले.