चालू घडामोडी – २९ ऑगस्ट २०२४ (Current affairs in Marathi)

⚫ आनंद कुमार यांची दक्षिण कोरियाच्या पर्यटनाचे राजदूत म्हणून निवड झाली आहे.

⚫ ओडिसा राज्याने सुभद्रा योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. पाच वर्षांमध्ये, प्रत्येक पात्र महिलेला एकूण 50,000 रुपये मिळतील.

⚫ जय शहा यांची अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

⚫ कोल्हापूर जिल्ह्यातील सागर बगाडे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाला.

⚫ RBI बँक डिजिटल प्लॅटफॉर्म युनिफाईड लेडिंग इंटरफेस लाँच करणार आहे.

⚫ पंतप्रधान जनधन योजनेला १० वर्षे पूर्ण झाली असून या योजेअंतर्गत ५३.१३ कोटी खाते उघडण्यात आले आहेत.

⚫ आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धा चीन देशात आयोजित करण्यात येणार आहे.

⚫ हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री सुख शिक्षा योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत विधवा, एकल महिला आणि अपंग मुलांच्या शिक्षणाचा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचा खर्च सरकार उचलणार आहे.

⚫ Amazon ने भारतात AI-चालित शॉपिंग असिस्टंट चॅटबॉट Rufus लाँच केले आहे.

⚫ पंजाबमधील रोपर येथील पाच वर्षांचा तेघबीर सिंग माउंट किलीमांजारो सर करणारा तो आशियातील सर्वात तरुण ठरला आहे.

⚫ आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप 2024: भारताने मारुहाबा चषक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.

⚫ केंद्रीय मंत्रिमंडळाने जैवतंत्रज्ञान विभागाच्या ‘BioE3 (अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगारासाठी जैवतंत्रज्ञान) धोरणाला चालना देण्यासाठी उच्च कार्यक्षमतेच्या जैवनिर्मिती धोरणाला मंजुरी दिली.

⚫ अंडर 17 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 जॉर्डनमधील अम्मान येथील राजकुमारी सुमाया बिंत अल-हसन एरिना येथे आयोजित करण्यात आली होती.

⚫ बी श्रीनिवासन यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

⚫ भारती एअरटेलने अलीकडेच ॲपलसोबत संगीत आणि इतर सेवांसाठी भागीदारी केली आहे.

⚫ सतीश कुमार यांची रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

⚫ दलजित सिंग चौधरी यांची सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

⚫ बांगलादेशने अंडर-20 SAFF फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

⚫ डेव्हिड मलानने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो इंग्लंड देशाचा खेळाडू आहे.

⚫ कार्तिक वेंकटरामनने भारतीय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.