⚫ INS अरिघाट, भारतातील दुसरी आण्विक-शक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी, विशाखापट्टणममध्ये कार्यान्वित करण्यात आली.
⚫ केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांनी महिलांसाठी कार्यस्थळे अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन शी-बॉक्स पोर्टल लाँच केले.
⚫ पाकिस्तानी ख्रिश्चन जोसेफ फ्रान्सिस परेरा हे CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यात पहिले ठरले.
⚫ मॉस्को, रशिया येथे आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्यावरील संयुक्त रशियन-भारतीय आयोगाची दुसरी बैठक पार पडली.
⚫ भारतात दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. हा दिवस मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे.
⚫ नेमबाजी खेळात अवनी लेखरा हिने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
⚫ मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 चे आयोजन करण्यात आले होते.
⚫ हिमाचल प्रदेश विधानसभेने महिलांचे किमान विवाहाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्याचे विधेयक मंजूर केले.
⚫ केंद्र सरकारने 28,602 कोटी रुपयांच्या ग्रीनफिल्ड इंडस्ट्रियल स्मार्ट सिटी प्रकल्पांना राज्यांमध्ये 12 ठिकाणी मान्यता दिली.