चालू घडामोडी – ७ सप्टेंबर २०२४ (Current affairs in Marathi)

⚫ इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA) 5-6 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव आयोजित करेल.

⚫ विराट कोहली देशात सर्वाधिक आयकर भरणारा खेळाडू बनला आहे. शाहरुख खान २०२४ मध्ये देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलेब्रिटी ठरला आहे.

⚫ २०२४ मिस युनिव्हर्स स्पर्धा मेक्सिको येथे आयोजित करण्यात आली आहे.

⚫ पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या धर्मबीर ने क्लब थ्रो खेळात सुवर्ण पदक पटकावले आहे. कपिल परमार ने ज्युडो क्रीडा प्रकारात भारताला कांस्यपदक पटकावले.

⚫ इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), MeitY यांनी Blockchain-as-a-service ऑफर करण्यासाठी Vishvasya-Blockchain Technology Stack लाँच केला.

⚫ युनिसेफ इंडियासोबत पंचायती राज मंत्रालयाने सामाजिक बदलासाठी व्यवस्था मजबूत करण्याच्या उद्देशाने करार केला.

⚫ राजस्थान राज्य सरकारने पोलीस दलात महिलांना ३३ टक्के आरक्षण जाहीर केले.

⚫ बेंगळुरूचा जलतरणपटू सिद्धार्थ अग्रवाल याने इंग्लिश चॅनल पोहणारा सर्वात वयस्कर भारतीय बनून इतिहास रचला.