चालू घडामोडी – ९ सप्टेंबर २०२४ (Current affairs in Marathi)

⚫ 54 व्या GST कौन्सिलच्या बैठकीत, कर्करोगाच्या औषधांवरील GST दर 12% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आला.

⚫ बेलारूसच्या आर्यना सबालेन्का हिने २०२४ यूएस ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.

⚫ क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांची ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया (OCA) च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

⚫ भारताला जागतिक फॅशन लीडर बनवण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने VisionNext वेब पोर्टल सुरू केले.

⚫ योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर वनविभागाच्या भारवैसी, कॅम्पियरगंज रेंजमध्ये गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्राचे उद्घाटन केले.

⚫ जॅनिक सिनरने यूएस ओपन 2024 चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले.

⚫ भारताने अग्नी-4 या इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. अग्नी-4 क्षेपणास्त्र 4,000 किलोमीटरपर्यंत इतकी क्षमता आहे.

⚫ संयुक्त अरब अमिरातीने अरब जगतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प बरकाह अणुऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.