चालू घडामोडी – साप्ताहिक (नोव्हेंबर:१५-२१)

⚫ बंगालच्या उपसागरात भारत आणि बांगलादेश नौदलांमधील द्विपक्षीय सराव, बोंगोसागर-23 आणि समन्वयित गस्त (CORPAT) ची 5वी आवृत्ती पार पडली.

जगातील पहिल्या रोबोट सीईओचे नाव मिका आहे.

⚫ NPCI ने पंकज त्रिपाठी यांची ‘UPI सुरक्षा दूत’ म्हणून नियुक्ती केली.

⚫ आसाममधील रंगिया आणि मारियानी या रेल्वे स्थानकांना ईट राईट स्टेशनचा दर्जा मिळाला.

⚫ ३७ व्या राष्ट्रीय खेळांमध्ये सर्वाधिक पदके महाराष्ट्र राज्याने जिंकली आहेत.

⚫ ओडिसा राज्यात १० वा कलिंगा साहित्य महोत्सव आयोजित करण्यात आला.

⚫ बिहार राज्याने राज्यातील एकूण आरक्षण 75% पर्यंत वाढवणारे विधेयक राज्याने मंजूर केले.

⚫ माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने डिजिटल जाहिरात धोरण, 2023 जारी केले.

⚫ दिवाळीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव सोहळ्यात सुमारे २२.२३ लाख मातीचे दिवे प्रज्वलित करून अयोध्या या शहरात जागतिक विक्रम केला.

⚫ ICC ने अलीकडेच श्रीलंका क्रिकेट बोर्डाला निलंबित केले आहे.

⚫ ICC च्या ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू डायना एडुलजी आहे.

⚫ आईसलंड देशात १४ तासात ८०० भुंकपाचे झटके आले आहेत.

⚫ ITBP चे नवीन महासंचालक म्हणून अनिश दयाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली.

⚫ संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, जागतिक स्तरावरील इतर कोणत्याही प्रदेशाच्या तुलनेत दक्षिण आशियामध्ये हवामान बदलामुळे तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे.

⚫ युनायटेड स्टेट्स, कॅलिफोर्निया विद्यापीठातील अदरिंग अँड बेलॉन्गिंग इन्स्टिट्यूट (OBI) ने प्रकाशित केलेल्या समावेशन निर्देशांकात भारत 117 व्या क्रमांकावर आहे.

⚫ भारत आणि श्रीलंका देशासोबत संयुक्त लष्करी सराव ‘अभ्यास मित्र शक्ती-2023’ आयोजित केला जात आहे.

⚫ ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’ 2023 फरिदाबाद येथे आयोजित केला जाईल.

⚫ सिकंदर शेख यांनी ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली.

⚫ जगातील सर्वात उच्च माउंटन बाईक रेस ‘मान्डुरो 3.O’ अरुणाचल प्रदेश येथे आयोजित करण्यात आली आहे.

जकार्ता, इंडोनेशिया येथे 10 वी ASEAN संरक्षण मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली.

⚫ इंडो-पॅसिफिक रीजनल डायलॉग (IPRD), भारतीय नौदलाची वार्षिक उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे होणार आहे.

पुरुषांच्या वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कारासाठी नीरज चोप्रा या भारतीयाची निवड झाली आहे.

⚫ 2023 च्या ‘लता मंगेशकर पुरस्कार’ साठी महाराष्ट्र सरकारने सुरेश वाडकर यांची निवड केली आहे.

⚫ मेघालय राज्य सरकारने शुन्य भुक करण्यासाठी अन्न सुरक्षा मोहिम सुरू केली.

9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 17 जानेवारी ते 20 जानेवारी 2024 दरम्यान फरिदाबाद, हरियाणा येथे होणार आहे.

⚫ मित्र शक्ती-2023 सराव जो श्रीलंका आणि भारत या दोन देशांतील लष्करी सराव आहे, तो पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.

⚫ आशियाई खेळ २०२६ चे आयोजन जपान मध्ये होणार आहे.

⚫ सलमान रश्दी यांना व्हकलाव्ह हॅवेल सेंटरचा पहिला ‘लाईफटाईम डिस्टर्बिंग द पिस’ अवार्ड मिळाला.