चालू घडामोडी – साप्ताहिक (नोव्हेंबर:२२-३०)

⚫ FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक २०२३ मलेशिया या शहरात होणार आहे.

⚫ जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य खेळ कोलंबिया या देशात आयोजित केले आहेत.

⚫ भारत दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिटचे व्हर्च्युअल स्वरूपात आयोजन करणार आहे.

⚫ दिल्ली विमानतळाने अपंग लोकांच्या सोयीसाठी ‘सनफ्लॉवर इनिशिएटिव्ह’ विशेष सेवा सुरू केली आहे.

⚫ गोवा राज्यात 54 वा ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ आयोजित केला जात आहे.

⚫ ऑस्ट्रेलिया संघाने ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 चे विजेतेपद पटकावले.

⚫ आलोक वर्मा यांची विशेष संरक्षण गट (SPG) चे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

⚫ मिस युनिव्हर्स २०२३ शेनिस पॅलेसिओस यांनी जिंकला.

⚫ डॉ. मथवराज एस यांना मनोहर पर्रीकर यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळाला.

⚫ 2023 साठी केंब्रिज डिक्शनरीचा वर्षातील शब्द हॅलुसिनेट हा आहे.

⚫ ICC विश्वचषक 2023 मध्ये “प्लेअर ऑफ द टूर्नामेंट” हा किताब विराट कोहलीला देण्यात आला.

⚫ भारत आणि अमेरिका देशादरम्यान ‘वज्र प्रहार’ हा लष्करी सराव आयोजित केला जात आहे.

⚫ ‘ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया’ 2023 गुजरात मध्ये आयोजित केले जात आहे.

⚫ लदाख मधील सी बकथार्न ला GI टॅग मिळाला.

⚫ ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023, अहमदाबादमधील गुजरात सायन्स सिटी येथे आयोजित केला जाईल.

⚫ पंजाबी साहित्यासाठी धहान पारितोषिक मिळवणारी पहिली महिला दीप्ती बबुता ठरली आहे.

⚫ मागासवर्गीय आरक्षण कोटा 50% वरून 65% पर्यंत वाढवणारे विधेयक बिहार राज्य सरकारने मंजूर केले आहे.

⚫ उत्तर प्रदेश राज्य सरकारने शिक्षणात समानतेसाठी ‘प्रत्येक बालकाचा प्रत्येक हक्क’ अभियान सुरू केले.

⚫ भारत आणि ऑस्ट्रेलिया देशादरम्यान संयुक्त लष्करी सराव ‘ऑस्ट्राहिंद-2023’ आयोजित केला जात आहे.

⚫ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिसा राज्यात “नवीन भारतासाठी नवीन शिक्षण” नावाची राष्ट्रीय शैक्षणिक मोहीम सुरू केली.

⚫ जल जीवन अभियानांतर्गत पाणी जोडण्यासाठी उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे.

⚫ भारत – अमेरिका संयुक्त सराव ‘वज्र प्रहार’ मेघालय येथे सुरू झाला.

⚫ अमेरिकेने APEC अनौपचारिक नेते संवाद’ आयोजित केली.

⚫ अहमदाबाद शहरात नुकतीच पहिली ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023 सुरू झाली.

⚫ घोळ मासा गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे.

⚫ पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारे भारतीय डॉ. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन हे आहेत.

⚫ हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी शिमला शहरात ‘विद्या समीक्षा केंद्र’ चे उद्घाटन केले.

⚫ फार्मूला 1 लास वेगस ग्रेड प्रिक्स 2023 चे विजेतेपद मॅक्स वर्स्टॅपेन याने जिंकली आहे.

⚫ सतलज नदीत टॅंटलम दुर्मिळ घटक सापडला आहे.

⚫ राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी संबलपूर, ओडिशा येथे ‘न्यू एज्युकेशन फॉर न्यू इंडिया‘ मोहीम सुरू केली.

⚫ मेघालय राज्याने तरुणांमध्ये जलसंधारण जागृतीसाठी ‘वॉटर स्मार्ट किड कॅम्पेन‘ सुरू केले.

⚫ अफगाणिस्ताने भारतामधील आपले राजनैतिक मिशन कायमचे बंद करण्याची घोषणा केली.

⚫ 17 वा संयुक्त लष्करी सराव सूर्य किरण पिथौरागढ, उत्तराखंड आयोजित केला जात आहे.

⚫ इंडोनेशिया मध्ये ASEAN इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 आयोजित केले आहे.

⚫ FIH गोल किपर ऑफ द ईयर पुरस्कार 2023 सविता पुनिया यांना घोषित करण्यात आला.

⚫ तेलंगणाने जगातील पहिले 3D-प्रिंट केलेल्या मंदिराचे अनावरण केले.

⚫ स्टार्स एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये इश्वाक सिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

⚫ अटल इनोव्हेशन मिशन ने ऑस्ट्रेलिया सोबत सर्क्युलर इकॉनॉमी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी करार केला.

⚫ खेलो इंडिया पॅरा गेम्सची पहिली आवृत्ती नवी दिल्ली येथे होणार आहे.

⚫ तेलंगणाने जगातील पहिले 3D-प्रिंट केलेल्या मंदिराचे अनावरण केले.

⚫ स्टार्स एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये इश्वाक सिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

⚫ अटल इनोव्हेशन मिशन ने ऑस्ट्रेलिया सोबत सर्क्युलर इकॉनॉमी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी करार केला.

⚫ खेलो इंडिया पॅरा गेम्सची पहिली आवृत्ती नवी दिल्ली येथे होणार आहे.

⚫ गोवा राज्याला काजूसाठी भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला आहे.

⚫ पश्चिम बंगालने “Uber शटल” नावाची बस सेवा सुरू करण्यासाठी Uber सोबत सामंजस्य करार केला.

⚫ जगातील पहिले 3 D प्रिंटेड मंदिर तेलंगणा राज्यात बांधण्यात येत आहे.

⚫ डॉ. सुजित रॉय यांना NASA Impact planet अवार्ड मिळाला.

⚫ अनिश शहा यांची FICCI चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

⚫ संयुक्त राष्ट्र हवामान परिषद (COP28) युएई मध्ये आयोजित केली जाणार आहे.

⚫ संयुक्त अरब अमिराती या देशाने जगातील सर्वात मोठ्या सिंगल-साइट सोलर पॉवर प्लांट ‘अल धफ्रा’ प्रकल्पाचे उद्घाटन केले.

⚫ पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 चा शुभंकर ‘उज्ज्वला – एक चिमणी’ आहे.

⚫ भारत-नेपाळ संयुक्त लष्करी सराव ‘सूर्य किरण-XVII’ पिठोरागढ, उत्तराखंड होत आहे.

⚫ वाडीनार, गुजरात येथे भारतीय तटरक्षक दलाने 9वा राष्ट्रीय स्तरावरील प्रदूषण प्रतिसाद सराव (NATPOLREX-IX) आयोजित केला.

⚫ जागतिक शाश्वत वाहतूक दिवस 2023 ची थीम ‘शाश्वत वाहतूक, शाश्वत विकास’ ही आहे.

⚫ ओडिशा राज्यात आशियातील सर्वात मोठा ओपन एअर वार्षिक व्यापार मेळा ‘बाली यात्रा’ उदघाटन करण्यात आला.

⚫ सोमशेखर सुंदरेसन यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

⚫ अबू धाबी ग्रॅड प्रिक्स २०२३ मॅक्स वर्स्टॅपेन याने जिंकली.

⚫ उत्तर प्रदेश मधील बुंदेलखंड एक्सप्रेसवे हा पहिला सोलर एक्स्प्रेसवे असेल.

⚫ आरईसी लिमिटेडला ASSOCHAM द्वारे “विविधता आणि समावेशातील धोरणांसाठी सर्वोत्तम नियोक्ता” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

⚫ म्यानमारने बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला मायकॉन्ग हे नाव दिले आहे.

⚫ ‘प्रणव, माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्’ या पुस्तकाचे लेखक शर्मिष्ठा मुखर्जी आहेत.

⚫ मेरियम-वेबस्टर डिक्शनरीने 2023 साठी निवडलेला “वर्ड ऑफ द इयर” Authentic हा आहे.

⚫ अलीकडेच कंबोडिया देशातील अंगकोर वाट मंदिरला जगातील आठवे आश्चर्य म्हणून मान्यता मिळाली.

⚫ जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियम, कटक, ओडिशा येथे अल्टीमेट खो खो (UKK) ची दुसरी आवृत्ती होणार आहे.

⚫ सध्या चर्चेत असलेले बर्डा वन्यजीव अभयारण्य गुजरात राज्यात आहे.

⚫ इटलीने मालागा, स्पेन येथे झालेल्या डेव्हिस कप २०२३ चे विजेतेपद जिंकले आहे.