चालू घडामोडी – साप्ताहिक (नोव्हेंबर:१-७)

⚫ 37 व्या राष्ट्रीय खेळ (गोवा) मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रियांका गोस्वामीने महिलांच्या 20 किमी रेस वॉकमध्ये 1 तास 36 मिनिटे 35 सेकंदात पुर्ण करत एक विक्रम केला.

⚫ लिओनेल मेस्सीने 2023 मधील सर्वात्कृष्ट फूटबॉल खेळाडू म्हणून 8 व्यांदा बॅलन डी ओर हा पुरस्कार जिंकला.

⚫ स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ने महेंद्रसिगं धोनीला बॅंकेचे अधिकृत ब्रॅड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली.

⚫ युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान ऋषी सुनक 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी ब्लेचले पार्क, बकिंगहॅम शायर येथे AI समिट 2023 चे आयोजन करणार आहेत.

⚫ 2023 चा USISPF ग्लोबल लिडरशिप परोपकार आणि CSR अवार्ड नीता अंबानी यांना मिळाला.

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील छल्ला गावात भारतातील पहिले लैव्हेंडर फार्म तयार केले जात आहे.

केंद्रीय दक्षता आयोगाने दक्षता जागरुकता सप्ताह 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत चालणार आहे. या वर्षीची थीम “भ्रष्टाचाराला नाही म्हणा; राष्ट्राला वचनबद्ध राहा” आहे.

⚫ कॉलिन्स या शब्दकोशात क्रिकेटशी संबंधित ‘Bazball’ हा शब्द समाविष्ट करण्यात आला आहे.

⚫ शाहीन आफ्रिदी हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज बनला आहे.

⚫ ब्राझील या देशाने कॅलिसकोका नावाची लस तयार केली जी कोकेन व्यसनाच्या उपचारासाठी उपयुक्त आहे.

झारखंड मंत्रिमंडळाने गरीबांसाठी गृहनिर्माण योजना ‘अबुवा आवास योजना’ (AAY) मंजूर दिली, जी राज्यातील बेघरांना आठ लाख पक्की घरे देईल.

⚫ अवैध लाकडाच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ‘ऑपरेशन शेष’ च्या चौथ्या टप्प्याची सुरुवात केली.

⚫ आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3P स्पर्धेत सुवर्णपदक ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर याने जिंकले.

⚫ 2023 चा ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार नंदिनी दास
हिला मिळाला आहे.

⚫ ग्रामीण विकासातील कार्याबद्दल दीनानाथ राजपूत यांना द्वितीय रोहिणी नय्यर हा पुरस्कार देण्यात आला.

⚫ 2034 फिफा विश्वचषक सौदी अरेबिया या देशात आयोजित केले जाणार आहे.

कोझिकोड, हि एक केरळमधील शहर आहे या भारतीय शहराला “साहित्य शहर” म्हणून गौरवण्यात आले आहे.

⚫ लंडन येथे पार पडलेल्या वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर स्पर्धेत सर्वोच्च पारितोषिक विहान तल्या विकास मिळाले.

बांगलादेशातील सायमा वाजेद यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या नैऋत्य आशियाच्या प्रादेशिक संचालकासाठी निवडणूक जिंकली.

⚫ केरळ सरकारने केरळ ज्योती पुरस्कारासाठी प्रसिद्ध लेखक टी. पद्मनाभन यांची निवड केली आहे.

⚫ सशस्त्र सेना न्यायाधिकरण (AFT) चे अध्यक्ष म्हणून राजेंद्र मेनन यांची पुन्हा निवड झाली आहे.

⚫ भारतीय नौदलाची बहुप्रतिक्षित सेलिंग रेगाटा ‘इंडियन नेव्ही सेलिंग चॅम्पियनशिप’ मुंबई येथे आयोजित केली जाईल.

⚫ केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळुरूमध्ये ‘इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शो’चे उद्घाटन केले.

⚫ कर्नाटक राज्य सरकारने ‘डॉ. पुनीत कुमार ह्रदय ज्योती योजना सुरू केली, जी ह्रदय विकाराचा झटका आलेल्या लोकांना उपचार देणे हा उद्देश आहे.

⚫ चीन या देशाने जगातील पहिला प्रवासी वाहतूक करणारी फ्लाईग टॅक्सी ” Ehang’s EH216-S” मंजूर केली.